बाळापूर येथील DREAM2 अभ्यासिका आणि अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेवर बोलू काही’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच जिद्द, चिकाटी आणि सातत्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मा. संजय राजेंद्र चिंतलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश कापगते, हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव, शिपाई तसेच भारतीय सैन्य दलातील करण तायडे उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीचा अभ्यास करताना जिद्द, चिकाटी, सातत्य तसेच आयुष्यातील कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याबाबत संजय राजेंद्र चिंतलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एमपीएससीचा अभ्यास करताना कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, अभ्यासाच्या पद्धती आणि अभ्यासाच्या वेळेबाबत अविनाश कापगते आणि गणेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

तर शारीरिक चाचणी, गोळाफेक आणि रनिंग याबाबत करण तायडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत वानखडे सर यांनी केले, तर आभार उमेश जाधव सर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *