गिरडगाव गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे… प्रवीण नवल ढिवरे असं मृत इसमाचं नाव असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गिरडगाव, ता. यावल या गावाजवळ देवगाव, ता. चोपडा येथील प्रवीण नवल ढिवरे, वय ४२, हे दुचाकीवरून यावलच्या दिशेने येत होते. दरम्यान, त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.
