♦️ शेतात काम करताना अचानक सर्पदंश
♦️ किसना लहानुजी सोनवाने यांचा दुर्दैवी मृत्यू
♦️ नंदाजी हेटी सुरला परिसरात शोककळा
♦️ ५१ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने हळहळ
♦️ सोनवाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
♦️ शेतकरी आणि शेतमजुरांना सावध राहण्याचे आवाहन

NAGPUR | नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने किसना लहानुजी सोनवाने (वय ५१ वर्षे, रा. नंदाजी हेटी, सुरला) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सुरला परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किसना लहानुजी सोनवाने हे शेतात काम करत असताना अचानक एका सापाने त्यांना दंश केला. या सर्पदंशामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोनवाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शेतात काम करताना शेतकरी आणि शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी. सर्पदंश झाल्यास वेळ न घालवता संबंधित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *