शिवसेना तालुकाप्रमुख, नितीन येरोजवार यांची मागणी

मुल (सतीश आकुलवार)

चंद्रपूर  : कोविड–१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने घाईघाईत निर्णय घेऊन शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कडे मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली आहे .

गेल्या विस महिन्यामध्ये शाळा बंद असतांना सर्वसामान्य कुटुंबामध्ये शैक्षणिक, सामाजिक स्तरावर जे नुकसान झाले आहे ते भरून येणारे नाही आणी म्हणूनच शासनाने शाळा पुन्हा बंद करतांना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे. चुकीच्या लोकांचा सल्ला घेऊन शासन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान करत आहे. शाळा बंद राहिल्यामुळे संपूर्ण पिढी या निर्णयाने देशोधडीला लागणार आहे. शहरी भागात आणी ग्रामीण भागात शिक्षणाचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामीण भागातील मुलांवर या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन ते शिक्षण प्रवाहापासून दूर जाऊ शकतात. गरिबी, अठराविश्व दारिद्य्र यात ग्रामीण विद्यार्थी होरपळून जाईल. रोजी करणारे मजूर यांच्या मुलांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. हि गैरसोय तात्काळ थांबवली पाहिजे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पन्नास टक्के क्षमतेने शाळा आणी खाजगी कोचिंग क्लासेस सुरु करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही थांबवावे अशी मागणी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी मुल तहसीलदार होळी साहेब यांच्या मार्फतीने निवेदन मुखमंत्री , आरोग्य मंत्री यांना पाठवीले यावेळी मुल शहर प्रमुख राहुल महाजनवार, युवा सेना तालुकाप्रमुख संदिप निकुरे,शहर समन्वयक अरविंद करपे,महिला तालुकाप्रमुख रजनी झाडे ,युवा सेना सरचिटणीस विनोद काळबांडे तथा शिवसैनिक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *