राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ ह्यांची मुख्याधिकारी न. प. मूल यांना निवेदन द्वारे केली मागणी
चंद्रपूर : मूल (सतीश आकुलवार)
शहरातील वार्ड क्रं 8 चोखुंडे हेटी येथील रोड व नालीचे काम झालेले नसल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक गैरसोयीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष सुमित भाऊ समर्थ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
मुल मधील अनेक वार्ड मध्ये रोड व नालीचे काम हे पूर्ण झालेले नाही त्यामुळे तेथील रहिवाश्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस रस्ता – नाल्या – पथ दिवे- नळबील संबंधित वाढते अडचनी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ
ह्यांनी नगर परिषद मुल चे मुख्याधिकारी ह्यांचेशी भेट घेऊन शहरातील वार्डातील अनेक विषयांवर चर्चा केली ! चर्चे दरम्यान सदर विषयाला लवकरात- लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी ह्यांनी दिले ! सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे, साईनाथ गुंडोजवार, युनूस शेख , वैभव शिवणकर , शुभम खोब्रागडे ,नंदू कावळे, इंद्रापाल पुणेकर, सविता कावळे,वीणा मेश्राम, माधुरी शेडमाके, लक्ष्मी मडावी, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.