चंद्रपूर, मूल (सतीश आकुलवार)
आज दिनांक ०३-०१-२०२२ रोज सोमवारला दुपारी ३.०० वाजता मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रसिद्ध प्रवक्ते तथा महाराष्ट्र प्रदेशचे समता परिषदचे प्रसारक डॉ नागेशजी गवळी साहेब ह्यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करण्यात आले !
सदर कार्यक्रमाला डॉ नागेश गवळी ह्यांचे सोबत उपस्थिती म्हणून समता परिषद चे जिल्हा प्रमुख जगदीश जुनघरी उपस्थित होते !
पाहुण्यांचे मूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आगमन होताच पदाधिकारी कडून स्वागत करण्यात आले !
सदर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांनी केले !
उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख पदाधिकाऱ्यांना डॉ नागेश गवळी ह्यांनी मौलाचे मार्गदर्शन केले !
सदर कार्यक्रमाला डॉ नागेश गवळी ह्यांचे सोबत उपस्थिती म्हणून समता परिषद चे जिल्हा प्रमुख जगदीश जुनघरी उपस्थित होते !
मूल येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्ष वाढीबाबत होत असलेल्या कार्याची डॉ नागेश गवळी ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ व संपूर्ण मूल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्तुती करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आले !
सदर छोटेखानी कार्यक्रमात पदाधिकारी ह्यांची उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे,जेष्ठ नेते निपचंद शेरकी , कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला नेत्या सौ भाग्यश्री तागडे, प्रभाकर धोटे, अश्विन खोब्रागडे, वाघमारे सर,प्रशांत भरतकर, वैभव शिवणकर , किशोर पेटकुले ,शिवम कुमरे,इंद्रापाल पुणेकर, नरेंद्र कामडी,प्रल्हाद कीर्तने , सुमीत लाकडे, वसंत वारजूरकर , ताजने सर आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.