चंद्रपूर : आज दिनांक 29/01/2022 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बल्लारपुर विधान सभा क्षेत्र कार्यालयात मुल येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य व बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमित भाऊ समर्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथामिक व क्रियाशील सभासद सदस्यत्व फार्म भरणे मोहीम सुरू करण्यात आले ! सदर मोहिमेत अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सभासद नोंदणी ला सुरवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमात प्रमुख उस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते श्री सुमित समर्थ, जिल्हा सचिव सुधाकर काटकर, मुल तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर मोहीमे अंतर्गत मुल तालुक्यात व शहरात जास्तीत जास्त सदस्य नोदणी करण्याच्या निर्धार सुमित समर्थ यांनी व्यक्त केला. यावेळी शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे , शहर उपाधयक्ष साईनाथ गुंडोजवार ,प्रभाकर जी धोटे, ज्ञानेश्वर जी वाघमारे, प्रमोद तासलवार व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुल (सतीश आकुलवार)