चंद्रपूर : मूल शहरातील मुख्य गूजरी चौकात देशाचा राष्ट्रीय सन स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. ठरल्याप्रमाणे दरवर्षी गुजरी चौक येथील झेंडावंदन आठ वाजून 30 मिनिटांनी केला जात होता, मात्र नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने मूल नगरपरिषदेवर प्रशासक बसले आहे. प्रशासकांचा मनमानी कारभार चालवून आठ वाजताच झेंडावंदन करण्यात आला. असा आरोप मूल नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केला आहे.

मूल नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. प्रशासक बसून एक महिना पूर्ण झाला. आता प्रशासक आपल्या मनमर्जीने काम करीत आहे. मूल येथील मुख्य गुजरी चौकात दरवर्षी मोठ्या मानाने झेंडावंदन करण्यात येते, काही वर्षाआधी शहरातील प्रतिष्ठित- ज्येष्ठ नागरिक यांना झेंडा फडविण्याचा मान देण्यात येत होता. त्यामुळेच येथील झेंडावंदनाला मानाचा झेंडा असे संबोधण्यात येत होते. त्यानंतर नगरपालिकेत ठराव करून नगराध्यक्ष झेंडा फडकविण्याचे ठराव घेण्यात आले. झेंडावंदनाच्या वेळी शहरातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी सोबतच शहरातील प्रतिष्ठित, ज्येष्ठ नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते झेंडावंदनाला मानाने उपस्थित असतात. सर्वांना आठ वाजून तीस मिनिटांचा झेंडावंदनाचा वेळ सर्वस्तृत आहे. मात्र आताच्या नगरपालिकेतील प्रशासकाने हे अनेक वर्षाची झेंडावंदनाची परंपरा वेळेच्या आधीच झेंडावंदन करून तोडली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असून पालिकेत वचक राहिला नसल्याने प्रशासक आपल्याच मनमानी कारभाराने काम करीत आहे. नगरपालिकेतील झेंडावंदनाचा वेळ ठरविणारे आस्थापना विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.नुकतेच चंद्रपूर मार्गांवर भर रस्त्यात उभी असलेली अचानक चारचाकी वाहन पेट घेतली. आग विझवीण्याकरिता नगरपालिका प्रशासक अग्निशमन गाडी उपलब्ध करू शकली नाही. नगरपालिकेतील प्रशासक सपशेल फेल ठरले असल्याचा आरोपही माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केला आहे.
प्रतिक्रिया
मला नगरपालिकेकडून सकाळी 8 वाजता झेंडावंदनाकरिता वेळ दिला होता, त्या वेळेप्रमाने मी झेंडा फडकवीला.
महादेव खेडकर, प्रशासक नगरपालिका तथा उपविभागीय अधिकारी, मूल
मुल (सतीश आकुलवार)