आ. तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यासंदर्भातील निवेदन
चंद्रपूर (सतीश आकुलवार) : राजगाटा ते गडीसूरला मार्गाच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. हा मार्ग फिस्कुटी गावातून जातो. या रस्त्याचे काम फिस्कुटी गावातून डांबराचे न करता सिमेंट – काँक्रिटचे करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन आ. तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वन अकादमी विश्रामगृह येथे देण्यात आले.
तसेच फिस्कुटी गावातील विविध विकास कामाबाबतची चर्चा आ. तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत सरपंच नितीन गुरनुले यांच्या अध्यक्षते खालील शिष्टमंडळाने केली.
यावेळी सरपंच नितीन गुरनुले, ग्रा. पं. सदस्य सतीश कावळे, सूरज मांदाळे (कार्यकर्ता), रवी चौधरी व कुणाल सातपुते उपस्थित होते.