वाशिम – दिव्यांगांना ५ टक्के निधी वाटपासह इतर विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेची जिल्हास्तरीय बैठक १५ मे रोजी स्थानिक विश्रामगृहामध्ये घेण्यात आली. बैठकीला अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला संपर्कप्रमुख गंगुबाई पवार, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव गुडदे, जिल्हा सल्लागार संतोष घुगे, मालेगाव शहराध्यक्ष महेंद्र पखाले आदींची उपस्थिती होती.


यावेळी मारोती मोळकर यांनी उपस्थित दिव्यांगांना शासनाकडून दिव्यांगांसाठी निर्गमित झालेल्या विविध शासननिर्णयाची माहिती दिली. प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपआपल्या क्षेत्रात या निर्णयाची पुरेपुर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करावा असे सांगीतले. तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांगांचा ५ टक्के निधी खर्च करण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर तक्रार निवारण अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, नगर पालीका, नगर परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के निधी १५ दिवसाच्या आत खर्च करावा, आमचे गाव आमचा विकास या योजनेतील ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप करावा, दिव्यांगांसाठी नविन विभक्त शिधापत्रिका त्वरीत वाटप करावे, खासदार, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून राखीव ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप करावा, दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभासाठी प्राधान्य देवून जागा उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्यांसाठी लवकरच संघटनेच्या वतीने आंदोलन सुरु करण्यात येईल असे मोळकर यावेळी म्हणाले. यावेळी गंंगुबाई पवार, बबनराव गुडदे यांनी आपल्या भाषणातून दिव्यांगांना मार्गदर्शन केले. बैठकीला मालेगाव शहराध्यक्ष महेंद्र पखाले, तिवळी सर्कलअध्यक्ष दत्ता सुर्वे, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल उगले, वाशिम शहर उपाध्यक्ष एकनाथ राऊत, शोभा राऊत, ऋषीकेश मोहळे, लक्ष्मण कापसे, यशोदा घायाळ, गंगाराम कापसे, पुजा उचित, ज्ञानदेव गायकवाड यांच्यासह जिल्हाभरातून दिव्यांग महिला, पुरुष व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *