सचिन बिद्री:उस्मानाबाद

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील आदर्श सरपंच सुनिता पावशेरे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा सम्मान, आयडीयल लीडर अवार्डने सम्मानित करण्यात आले. एम.व्ही.एल.ए.ट्रस्टच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तीना प्रतीभा सम्मान,आयडीयल लीडर अवार्डने नवी दिल्ली येथे (10मे ) इंटरनॅशनल टलेंट आयकाॅन, पद्मश्री डॉ.साविपिना राव यांच्या हस्ते व पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी सन्मानित करण्यात आले.

महिला सरपंच सुनिता पावशेरे यांनी अल्पावधीतच कलदेव निंबाळा या आपल्या गावात शिक्षण,कृषी, आरोग्य,विद्युतीकरण, रस्ते यांसह विविध विकास कामे, महिला बचत गटाची मोठी चळवळ,रक्तदान शिबीरे ,कोरोना संसर्ग काळात आदर्श कार्य, लोकवाट्यातून कामे,अनेक सामाजिक उपक्रम, विविध जयंती, व्याख्याने , प्रबोधन कार्यक्रम, महिला जनजागृती, आंदोलन विद्यार्थी,युवक युवती, जेष्ठ नागरिक यांच्या साठी सातत्याने विविध उपक्रम व कार्यक्रम राबवत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.

विविध योजनांचा जिल्हा, राज्य शासन स्तरावर पाठपुरावा कलेला आहे.कलदेव निंबाळा ग्रामपंचायत आय एस ओ मानांकित केली आहे.यापूर्वी त्यांना शासन व विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.या प्रसंगी भारतातील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्यांचा सम्मान करण्यात आला. यावेळी त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे उपस्थित होते. या पुढेही सर्वांना सोबत घेत,’मी सरपंच मी लोकसेवक’ या भावनेतून काम करत गावचा सर्वांगीण विकास करत गाव आदर्श करण्यासाठी कार्य करणार असल्याचे पुरस्कार स्वीकारताना आपल्या मनोगतात सुनिता पावशेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय स्तरावर सन्मानित झाल्याबद्धल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार,तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह पं.स.माजी सदस्य सदस्य बाळासाहेब स्वामी, उपसरपंच मिनाबाई पाटील, ग्रामसेवक सुनिल पांचाळ,चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी पाटील,पोलीस पाटील पांडूरंग पाटील,ग्रा.सदस्य , गावकरी, बचतगट महिला,पावशेरे कुटुंबीय यांनी सुनिता पावशेरे यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *