सचिन बिद्री

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा शहरातील जुनी पेठ येथील महात्मा बसवेश्वर युवा प्रतिष्ठान व महात्मा बसवेश्वर मंदिर समितीच्या वतीने अक्षय तृतीया ते दिनांक ११ मे २०२२ या कालावधीत महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक शहरात जुनीपेठ येथे काढण्यात आली.

या मिरवणुकीमध्ये कर्नाटकातील नंदी कोल, लातूर जिल्ह्यातील चंदनवाडी येथील हलगी पथक, विविध वेशभूषा केलेले बालकलाकार आणि परिसरातील युवक व आबालवृद्ध यांनी मिरवणुकीची शोभा वाढविली. पारंपरिक वाद्याच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत उमरगा पोलीस स्टेशनच्या वतीने देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. अतिशय शांततापूर्ण वातावरणात आणि उत्साहात ही मिरवणूक संपन्न झाली.ही मिरवणूक यशस्वी करण्याकरिता श्रीकांत पतगे, नितीन ठाकुर , सोमनाथ घोडके , परमेश्वर मुद्गुले , सन्नी पाटील,प्रविण स्वामी , परमेश्वर स्वामी,अशोक तेलंग , महेश दुबे,इरणा बसगुंडे , शंकर हेबळे,बालाजी जाधव,विष्णु बिराजदार , बालाजी कुडुंबंले, महेशंकर पाटील भिमाशंकर व्हनाजे यांच्यासह तालुक्यातील अनेक गावातून आलेल्या शिवा संघटना आणि बस व ब्रिगेडच्या युवकांनी परिश्रम घेतले आणि मिरवणूक शांततेत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *