उस्मानाबाद : सचिन बिद्री

दि. 9 मे सोमवार रोजी गोवा राज्याचे लोकायुक्त तथा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी जिल्ह्यातील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेत सहभागी होवून आपले बहुमोल विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संवाद शैली वापरून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची यावेळी उत्तरे दिली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा विषय सोपा जावा म्हणून विज्ञानाच्या संकल्पना या कायदा शिकत असताना कशा वापरायच्या..? हे शिकवले.विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावावी त्यासोबतच तणाव मुक्त आरोग्याची काळजी कशी घ्यावी..?हे अगदी सोप्या भाषेत सुचवले. या प्रसंगी प्रास्ताविक पर भाषण प्राचार्य डॉ वी जी शिंदे यांनी केले.
संस्थेच्या वतीने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ व्हीं जी शिंदे , ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकृष्ण दानवे , वात्सल्य सामाजिक संस्थेचे सचिव श्री उमाकांत मिटकर तसेच IQAC विभागप्रमुख प्रा. नितीन कुंभार उपस्थित होते. हा कार्यक्रम विधी महाविद्यालयाच्या IQAC विभागाअंतर्गत आयोजी केला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मिता कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा श्रियश मैंदर्कर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *