सचिन बिद्री:उमरगा
गुरुवार दि.२१ जुलै रोजी जि.प.उस्मानाबाद च्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीम.रत्नमाला गायकवाड यांच्या सूचनेनुसार व संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक श्री एन एम माने , उपमुख्याध्यापक श्री बी एस जाधव , पर्यवेक्षिका श्रीम एस एम आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे विध्यार्थी व शिक्षक यांनी तब्बल 500 रोपट्यांचे श्री क्षेत्र अचलबेट रिसरात लागवड केली आहे .
सदर वृक्षारोपण उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी टिकाव ,खोरे,टोपले , पाण्याच्या घागरी या साहित्यनिशी सकाळी ठीक 9 वाजता अगदी शिस्तीत अचलबेट या ठिकाणी चालत जाऊन,नेमून दिल्याप्रमाणे ५-५ विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रथमतः खड्डे खोदून घेतले,त्यानंतर प्रत्येक खड्यात 1 याप्रमाणे 500 रोपट्यांचे लागवड करून घेतले.प्रत्येक लावलेल्या रोपट्याला पाण्यासाठी आळे तयार करून घेतले.सदर रोपटे जगावण्यासाठीची जबाबदारी विध्यार्थी व शिक्षक याना यावेळी देण्यात आली.

दर आठवड्याला किमान एकदा या ठिकाणी भेट देऊन झाडांची काळजी घ्यायचे सर्वानुमते ठरले असून या झाडांना जगवण्यासाठीची पुढील आठवड्यात शिक्षकांकडून ठिबक सिंचन योजना करावयाचे ठरले आहे. वृक्षारोपणानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र वनभोजनाचा आनंद घेतला.त्यानंतर सदर पवित्र अश्या देवस्थानी विविध गीते,कोडे , शैक्षणिक खेळ आदी उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री एन एम माने,उपमुख्याध्यापक श्री बी एस जाधव,पर्यवेक्षिका श्रीम आहिरे एस एम,जेष्ठ शिक्षक श्री एच व्ही पवार , श्री जि व्ही मुगळे,श्री डी जे मेलगिरी, श्री एम आइ शेख,श्री आर एस पाटील आणि इतर शिक्षकवृदं,कर्मचारीवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.