गोंदिया : हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ गोदिंया मार्गदर्शित उत्कर्ष लोक संचालित साधन केंद्राव्दारे रुरल मार्ट शितला माता चौक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील गोदिंया यांचे शुभहस्ते निवासी उपजिल्हाधिकारी जयंत देशपांडे निवासी व संजय संगेकर जिल्हा समन्वय अधिकारी माविम यांच्या प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाले.
उदघाटन कार्यक्रमाला सतिश मार्कंड सहा जि.सम.अधिकारी, योगेश वैरागडे, प्रदिप कुकडकर, राम सोनवाणे, हेमंत मेश्राम, श्रीमती मोनिता चौधरी, श्रीमती कुंजलता बोरकुडे, श्रीमती तृप्ती चावरे, केंद्राचे कार्यकारी मंडळ, कर्मचारी व बचतगटाच्या सदस्य उपस्थित होते.
माविम मार्गदर्शित सालेकसा तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ६००० झेंडे,आमगाव तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ग्रामिण भागात ५००० झेंडे, व शहरी भागासाठी ५०० झेंडे, देवरी तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ग्रामिण भागात १०००० झेंडे, व शहरी भागासाठी १००० झेंडे,सडक अर्जुनी तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे स.अर्जुनी व मोर ग्रामिण भागासाठी१५००० झेंडे, व शहरी भागासाठी ३०० झेंडे, गोरेगाव तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ग्रामिण भागात १०००० झेंडे, व शहरी भागासाठी ५०० झेंडे, गोदिंया तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ग्रामिण भागात १०००० झेंडे, व शहरी भागातील शासकीय विभागासाठी १५०० झेंडे, तिरोडा तालुक्यातील लोक संचालित साधन केंद्राव्दारे ग्रामिण भागात ५००० झेंडे, व शहरी भागासाठी ४००० झेंडे असे एकुण ८५००० झेंडे रेशन दुकानदार व नगर पचांयत यांना विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय बचतगटाव्दारे १०००० झेंडे तयार करुन गटातील गरीब गरजु कुटुंबाना वाटप करण्यात येणार आहे.