६५० विद्यार्थ्यांनी दिली भेट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,हर घर तिरंगा बाबत दिली माहिती….
गोंदिया: भारत राखीव बटालीयन-२, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१५, बिरसी कॅम्प गोंदिया येथे स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सव निमीत्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन ०१ ऑगस्ट २०२२ पासुन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ०२ ते ०४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत गोंदिया शहरातील तथा ग्रामीण भागातील विविध शाळा, महाविद्यालय आश्रम शाळा तेथील विद्यार्थ्यांकरीता शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
त्या मध्ये प्रोगेसिव्ह कान्व्हेट गोंदिया, जीईएस ज्युनिअर कॉलेज कामठा, संत जयरामदास आदिवासी आश्रम शाळा कामठा, सेंट झेवियर्स हायस्कुल गोंदिया, गोंदिया पब्लीक स्कुल गोंदिया व इतर नांमाकित शाळांच्या ६५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
विद्यार्थ्यांना “हर घर तिरंगा”, राष्ट्रीय ध्वजाबद्दल सविस्तर माहिती देवुन, राष्ट्रीय ध्वजाचा मान कसा राखता येईल या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच शस्त्र प्रदर्शनी सोबतच विद्यार्थ्यांना राज्य राखीव पोलीस बलाच्या कार्यपध्दती प्रशिक्षण कर्तव्य व सामाजिक कार्यातील सहभागाचा सविस्तर आढावा देण्यात आला गटातील उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक शस्त्र साठयाचे प्रत्यक्ष प्रदर्शन विद्यार्थ्यांना घेता आले. ज्यामुळे विद्यार्थी खुप जास्त उत्साहित व आनंदित होते. शस्त्राच्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व शंकाचे निरसन गटातील प्रशिक्षण इन्स्ट्रक्टर यांचे कडुन करुन घेतले.
कार्यक्रमाच्या आयोजना करीता समादेशक श्रीयुत विवेक मासाळ यांनी दिलेल्या दिशा निर्देशान्वये संपुर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. बटालीयनचे समादेशक सहायक संजय साळुंखे यांनी शस्त्र प्रदर्शनचे कुशल आयोजन केले. या करिता सहायक समादेशक कैलास पुसाम, पोलीस उपनिरीक्षक एस बी चौधरी, पोलीस उपनिरीक्षक एम एस जोगे, पोलीस उपनिरीक्षक परिहार, पोलीस उपनिरीक्षक प्रंशात नारखेडे यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता व समन्वय राखण्याकरीता पोलीस कल्याण अधिकारी सुनिल चव्हान यांनी समन्वय साधुन महत्वाची कामगिरी पार पाडली. गटातील रक्षक जमादार सहा. पोउपनि मनोज घुबडे यांनी शस्त्र प्रदर्शनी दरम्यान अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व चांगल्या प्रकारचे शस्त्राबदल माहिती मिळेल यांची काळजी घेतली. विद्यार्थ्यांकरीता रिफ्रेशमेंटची व्यवस्था बटालीयन कडून करण्यात आली.