शेवटी अशांतभाई वानखेडे यांनी स्वखर्चाने बुजवले खड्डे

मलकापूर:- मलकापूर बसस्थानका परिसरात पडलेल्या खड्ड्यामध्ये रोजच्या रोज छोटे-मोठे अपघात होत होते या अपघाताच्या बातम्या सर्वच न्यूज पेपर ला प्रसिद्ध होत असून सुद्धा प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत होते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेताच समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अशांतभाई वानखडे यांनी स्वखर्चाने बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजऊन बस चालक व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या सहा महिन्यांपासून बस स्थानक परिसरात पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे बस चालकास व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. या अपघाती खड्ड्या याबाबत वारंवार महामंडळ प्रशासनाला विचारणा केली असता महामंडळ प्रशासनाकडून योग्य ते उत्तर मिळत नसे, पत्रव्यवहार केला आहे,निधी उपलब्ध होत नाहीये असे वारंवार सांगण्यात येत होते. महामंडळ प्रशासन जीवघेणे खड्डे बुजण्यात सक्षम नसल्याचे समजले. या सर्व घटनेची माहिती व विद्यार्थ्यांना होणारा त्रास तसेच रोजच्या रोज पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात पत्रकार यांनी माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांना माहिती दिली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघाती खड्ड्यांची पाहणी करून ताबडतोब स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजले. यावेळी उपस्थित मलकापूर आगाराचे प्रमुख दादाराव दराडे यांनी अशांतभाई वानखडे यांचे मनःपूर्वक आभार मानले व बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या समस्यां बाबत चर्चा केली. यावेळी अशांतभाई वानखेडे, पत्रकार दिपक इटणारे, आगार प्रमुख दादाराव दराडे, ऋषिकेश नेमाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *