आलापल्ली नागेपल्ली च्या व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा…..
गडचिरोली : त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज ८०० ते १००० जड वाहनाणे एटापल्ली मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली या राष्ट्रीय महामार्गावरून नेने सुरु आहे. त्यामध्ये अनेक जड वाहन परिवहन खात्याकडून मंजुरीपेक्षा जास्त माल भरून वाहतूक करीत आहेत . त्यामुळे मद्दीगुडम आलापल्ली नागेपल्ली ते आष्टी पर्यंतचा पूर्ण राज्यमहामार्गावर मोठे मोठे जीवघेणे खडे पडलेले आहेत..
आलापल्ली ते नागेपल्ली रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत . त्यातच सर्व लोड, वाहनाचे धूर व्यापारांच्या दुकानात उडतो. त्यामुळे दुकानाचे नुकसान होत आहे. नागरिकांना खोकला आणि श्वसनाचे आजार बळावत चालले आहेत…रोडच्या आजूबाजूला वास्तव्याचे घरे आहेत. अहोरात्र दररोज ८०० ते १००० जड वाहन वाहतूक होत असल्याने शाळाकरी मुलांना सायकल, मोटर सायकल घेऊन चालण्याचे भितीमय वातावरण निर्माण झाले आहे. आलापल्ली व नागेपल्ली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, ८ हायस्कूल, ५ महाविद्यालय, १० अंगणवाडी, ३ इंग्रजी माध्यम शाळा आणि १ आय. टी. आय. असून एकूण ५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर विद्याथ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी आलापल्ली ते चंद्रपूर मेन रोड राज्य महामार्गाचा उपयोग करावा लागतो. या एकमेव मार्गावर जाने येणे करिता जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत एटापल्ली ते आष्टी मार्गावर १० ते १५ अपघात झालेले असून अनेकदा जिवित .हानी झाली आहे. तसेच अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी सामान्य विद्यार्थी, जनमानसाची जिवित हानी झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची ? हा प्रश्न आलापल्ली व नागेपल्ली ग्रामस्थांना भेडसावत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक नेहमी उभे असतात त्यामुळे सामान्य नार्गीकाला वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायत आलापल्ली व नागेपल्ली यांनी ग्रामसभा घेऊन कार्यवाही अहवाल प्रस्ताव दिलेला असून यासोबत सहपत्रीत करण्यात आले. तरी त्यानुसार कंपनीकडून कार्यवाही अपेक्षित झाली नाही. तक्रारीचे दिनांकापासून १० दिवसाच्या आत आलापल्ली ते नागेपल्ली रोड खड्डेमुक्त करण्यात यावी व जड वाहनांची वाहतूक सकाळी ०६:०० ते रात्रो ०९:०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावे किंवा एक वेगळा गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावे असे निवेदन संबंधितांना दिले आहे. अन्यथा आलापल्ली / नागेपल्ली सर्व ग्रामस्थ कंपनीचे वाहन वाहतूक होवू देणार नाही. व चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. याची कंपनी व्यवस्थापक व शासकीय निन्मशासकीय अधिकारी यांनी नोंद घ्यावी. असी तक्रार व्यापारी संघटना कडून सर्व विभागाला देण्यात आले..