हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांअंतर्गातील शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाली त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने 25 जुलै रविवारी रोजी सायंकाळी छापा टाकून 4.87 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी सात जणांवर आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचा कसुरी अहवाल सादर केला त्या अहवाला वरून हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी 26 जुलैला सोमवारी रात्री उशीरा काढले आहे. अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवर झालेल्या कारवाई मुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे