पो.अधीक्षक यांच्या कुशल कर्तव्यबजावणी बाबत ग्रामस्थांनी केला सत्कार
उस्मानाबाद:सचिन बिद्री
अत्यंत सक्षमपणे जिल्हाभरात सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था जोपासण्याचे,गुन्हाचा शोध घेण्याचे कार्य जिल्हा पोलीस अधीक्षक मा.राज तिलक रौशन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली होत आहे.त्यांच्या या कुशल नेतृत्वा बाबत मंगळवार दि.27 जुलै 2021 रोजी उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील ग्रामस्थांच्या वतीने प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, उपसरपंच सचिन वाडीकर यथोचित सत्कार केला.या सत्कारा प्रसंगी सरपंच लक्ष्मीबाई झाकडे,माजी सरपंच रामानंद मुकडे,सुरेश झाकडे, माजी सरपंच प्रभाकर बिराजदार,प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते.
आय पी एस रौशन यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्यांना केंद्रीय गृहखात्याचा ‘मिडल फॉर एक्सलन्स इन इन्व्हेस्टीगेशन पुरस्कार’,स्मार्ट पोलिसिंग चा FICCI पुरस्कार, आयआयटी खरगपूरचा यंग अँलूमणी अचिव्हमेंट पुरस्काराने गौरवित करण्यात आले आहे.त्यांचा ‘दि गुड, दि बॅड आणि दि अननोन’ हा ग्रंथ गुन्ह्यांची मर्मग्राही मीमांसा करणारा आहे.ते खरगपूर येथून बी. टेक. एम. टेक असून 2013 च्या बॅचचे आयपीएस आहेत.अशी यावेळी डॉ श्रीकांत गायकवाड यांनी माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला असून. राज्यात ११ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य असून, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत..असा याचा अर्थ होतो.