गोंदिया : (देवरी) गेल्या दीड वर्षापासून करोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. मात्र सध्या करोनाची दाहकता कमी झाल्यामुळे शासनाने मंदिरे खुली केली असुन निर्बंद हटविलेेेले आहेत. शासनाने जरी मंदिरे खुली केली व निर्बंध नसली तरी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावेत व नवरात्र उत्सव आनंदाने साजरा करावा, असे आवाहन गोंदिया जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांनी केले आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवरी पोलिस उपमुख्यालयात शांतता कमिटीची बैठक आज (दि.२४ स्पटेबंर रोजी) आयोजित करन्यात आली होती. या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधिक्षक़ अशोक बनकर, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ऊरकुडे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील विविध मंडळातील पदाधिकारी तसेच सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर म्हणाले, करोनाच्या दुसर्या लाटेत अनेक जणांना प्राण गमवावे लागले. सध्या ही लाट ओसरली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव साजरे करताना आपण ज्या भूमिका मांडल्या त्या श्रध्दा व भावनेच्या आहारी राहून मांडल्या. तरी सर्व नियम पाळूनच हा नवरात्र उत्सव साजरा करा, असे सांगितले. पोलिस निरिक्षक रेवचंद सिगंनजुडे म्हणाले, मंदिरे उघडली असली तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये, शासनाचे सर्व नियम पाळूनच या नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा. यावेळी कोणत्याही मंडळाची अडवणूक न करता त्यांना नियमानुसार परवानगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.