राजेश खवले यांनी दाखविली हिरवी झेंडी….

गोंदिया : भारत सरकारने आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंतीनिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास एस. बी. पाचखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रशेखर आंबोळे, अनंत वाघ, क्षेत्रिय अधिकारी (पश्चिम क्षेत्र), राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अनंत वाघ व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे उपस्थित होते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांचे अर्थसहाय्यातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे वतीने राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदिया या कार्यालयामार्फत मार्फत गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ रोजी रॅलीचे गोंदिया शहरात आयोजन करण्यत आले. या रॅलीला अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

रॅली सकाळी ९.३० वाजता श्री. शारदा वाचनालय, महात्मा गांधी प्रतिमा जवळ, गोंदिया येथून सुरु होऊन गांधी प्रतीमा-गोरेलाल चौक–इंदिरा गांधी स्टेडियम–डॉ. आंबेडकर चौक-जयस्तंभ चौक-गांधी प्रतिमा मार्गे परत श्री. शारदा वाचनालय, गांधी प्रतिमा जवळ, गोंदिया येथे समारोप करण्यात आला. गुरुनानक शाळा व जे. एम. हायस्कूल गोंदिया, राजस्थान विद्यालय, मनोहर म्युनिसिपल शाळा व महावीर महाविद्यालय गोंदिया शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *