ककोडी मूलभूत सुविधांपासून वंचित…

गोंदिया : स्वच्छ: भारत व डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणारा ग्रामीण भारत आजही विकासापासून मागासलेला असल्याची प्रचिती जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ककोडी गावाचे वास्तववादी चित्र पाहून येते. ककोडी हे गाव जिल्हापरिषद क्षेत्र असुनही जनप्रतिनीधिंच्या उदासीन धोरनांमुळे मूलभूत सुविधांन पासून वंचीत आहे. निवडणूका आल्या की स्थानीय नागरिकांना विकासाची प्रलोभने देऊन पुढारी निघून जात असल्याचा आरोप स्थानीकांनी लावलेला आहे.

साधारनत: तीन हजारांची लोक संख्येतील ककोडी हे गाव जिल्ह्याच्या टोकावर असुन देवरी तालुक्याच्या हद्दीत आहे. ककोडी हे जिल्हापरिषद क्षेत्र असुनही गाव विकासा ऐवजी समस्यांचं माहेर घर झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेकडुन कडून लाखांच्या घरात विकाश कामाकरीता लाखो वर खर्च केला जातो. तरीही ककोडीसह क्षेत्रातील बर्याच गावात मध्ये अद्यापही विकाश पोहचलाच नाही आहे. आमगाव – देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन करण्यात आले पण मुख्यता चिचगड ते ककोडी मुख्य रसत्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

ककोडी सह या क्षेत्रात मोडनार्या गावात नाल्या भरुन जीर्ण अवस्थेत असून नाल्याची सफाई होत नाही. गावातील रखडलेले रस्ते,रस्त्यांना पथदिव्याची व्यवस्था नसणे, रात्रीला रहदारी करणे देखील स्थानिकांना कठीण होत आहे. तालुक्याहुन ककोडीला जाण्यासाठी चिचगड – ककोडी हा ऐकच रस्ता आहे. चिचगड – ककोडी सुमारे २० किमी लांबीचा मुख्य रस्ता असुन , ज्यात मोठ-मोठे खड्डे, गिट्टी व गड्डे जास्त असुन नागरीकांना सायकल चालवनेही कठिन झाले आहे. विशेष म्हणजे ककोडी हे गाव छत्तीसगड सिमेला लागुन असल्याने शिमासुल्क वाचविन्याच्या नादात जड वाहतुक ककोडी-चिचगड मार्गाचा उपयोग करीत आहेत. तरीही जनप्रतिनीधिंचा याकडे दुर्लक्ष आहे.? महाशक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर आहे.अशा परिस्थितीत स्वछ: भारत,डिजिटल इंडिया व थोर पुरुषांच्या स्वप्नातील भारत कसा घडेल हाच प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *