गोंदिया:-
नारी शक्ती पुरस्कार योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयातील पात्र ईच्छुक उमेदवारांकडून केंद्र शासनाच्या अटी – शर्तीच्या आधीन राहून 31 ऑक्टेंबर 2022 पर्यंत नारी शक्ती पुरस्कार नामनिर्देशन प्रस्ताव,अर्ज व नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन द्वारे केंद्र शासनाचे www.awards.gov.in या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. तसेच ऑनलाईन द्वारे सादर केलेल्या प्रस्तावाची एक प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला, गोंदिया येथे सादर करावी.
नारी शक्ती पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांसाठी खुले आहेत, वैयक्तिक श्रेणीच्या बाबतीत पुरस्काराकरीता 1 जुलै 2022 रोजी किमान 25 वर्षे वय असणे आवश्यक आहे, अर्जदार व एखादी संस्था असेल तर अर्जदार यांनी किमान 5 वर्षे संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा, अर्जदार पुर्वी समान पुरस्कार प्राप्त नसावा, नारी शक्ती पुरस्कार उतकृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, व्यक्ती, समुह, संस्था, सामाजिक संस्था ई. महीलाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात किंवा नारीशक्ती पुरस्कार, अशा व्यक्ती, समूह, संस्था, सामाजिक संस्था ईत्यादींना दिला जाऊ शकतो. ज्या महीलांना निर्णय घेण्याच्या भुमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले. पारंपारीक आणि अपारंपारीक क्षेत्रांनी ग्रामीण महीलांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, सांस्कृतीक यासारख्या अपारंपारीक क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन दिले.

सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जिवन कौशल्य यासारख्या अपारंपारीक क्षेत्रात देणे व महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा. एक पुरस्कार एखादया राज्य किंवा राष्ट्रीय प्रदेशाला देखील दिला जाऊ शकतो. बाललिंग गुणोत्तर प्रमाणे लक्षणिय सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केल्याप्रमाणे मंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या कारणास्तव मृत्यु झाला असेल तर सामान्यतः अशा प्रकरणामध्ये पुरस्कार मरणोत्तर सादर केले जाणार नाही. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.