गोंदिया : अनैतिक संबंधातून एका इसमाची हत्या करणार्या आरोपीला तोवळ चार तासात चिचगड पोलिसांनी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुष्पाताई दिलीप अरकरा वय २६ वर्षे रा. तुमडीमेंढा देवरी हिने चिचगड पो.स्टे. ला रिपोर्ट दिली. की, १७ सप्टेंबर रोजी तिचा पती दिलीप संतराम अरकरा वय ३५ वर्षे रा. तुमडीमेंढा हा घरुन बेपत्ता झाला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन चौकशी सुरू केली असता १९ सप्टेंबर रोजी तुमडीमेंढा शेतशिवाराजवळील जंगल भागातील नाल्याजवळ फिर्यादीचा पतीचा मृतदेह आढळून आला.
पोलिस तपासात मृतक इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने वार करुन मारुन त्याच्या कमरलेला मोठा दगड बांधून नाल्याच्या पाण्यात फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर र्मगवरून पोलिस स्टेशनला पुष्पाताई दिलीप अरकरा यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक २६0/२0२२ कलम- ३0२, २0१ भा. दं. वि. चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्ह्य़ाच्या तपासात संशयित इसम नामे रतिराम दशरथ कुंभरे वय ४२ वर्षे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मृतक याचे रतिराम कुंभरे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी रतिराम दशरथ कुंभरे, छेदीलाल कारुजी आचले, मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा यांच्या मदतीने कुर्हाडीने सपासप वार करून त्यास जिवानीशी ठार करून प्रेताच्या कमरेला साडीने दगड बांधून नाल्याच्या पाण्यात फेकून दिल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद तिन्ही आरोपींना १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५७ वाजता सदर गुन्हयात अटक करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भिसे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, चिचगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स. पो. नि. शरद पाटील, पो.उप.नि. मनोहर ईस्कापे, स.फौ. र्हुे, पो.हवा. मसराम, पो.हवा. पदमे, पो. हवा. अंबुले, पो.हवा. गायकवाड, पो.ना. सुधाकर शहारे, पो.ना. कमलेश शहारे यांनी केली आहे. सदर गुन्ह्य़ाचा पुढील तपास स. पो. नि. शरद पाटील हे करीत आहेत.