फुलचंद भगत [प्रतिंनिधी ]
वाशिम : मा. पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे हस्ते आधुनिक सावित्री मपोशि संगिता ढोले यांना ५०००/- रोख रक्कम देऊन व सेवा पुस्तकात उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या नंतर नवनविन संकल्पनेच्या माध्यमातुन विविध कल्याणकारी, विविध समाजोपयोगी,कायदा व सुव्यवस्थे संबंधी संकल्पनांची अंमलबजावणी केली तसेच पोलीस खात्यात कार्यरत पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करुन वेळोवेळी त्यांना बक्षिसे देऊन गौरविले.

वाशिम जिल्हा पोलीस दलात तसेच वाशिम शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेली महिला पोलीस अंमलदार संगिता ढोले हे आपल्या दैनंदिन कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसुर न करता दिनांक १७/०४/२०२० पासुन आज पर्यंत बाहेरगावा वरुन मोल मजुरी करण्याकरीता वाशिम जिल्हयात आलेल्या गोरगरीब कामगारांची पाल्यावर भटकंती करणाऱ्या मुलांना ज्याना शाळा म्हणजे काय हे माहित नाही अशा मुलांना मोफत ज्ञान दानाचे काम करीत आहे. तिच्या शाळेमध्ये जवळपास ५० ते ५५ मुले/मुली रोज शिक्षणाचे धडे घेत असुन त्यांना संगिता ढोले योगाचे प्रशिक्षण देत आहेत.संगिता ढोले यांच्या कामामुळे पोलीस खात्याचे नाव लौकिक होत असुन हया कामाचे कौतुक संपुर्ण महाराष्ट्रभर होत असुन आधुनिक सावित्री म्हणुन सगळीकडुन गौरव करण्यात येत आहे. संगिता ढोले यांच्या कामाची दखल घेत मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. वसंत परदेशी यांनी कौतुकाची थाप देत त्यांना ५०००/- रोख रक्कम देऊन व सेवा पुस्तकात उत्कृष्ट कामगिरीची नोंद घेऊन सन्मानित करण्यात आले.