औरंगाबाद : अजिंठा वनपरिक्षेत्र यांच्या अंतर्गत आणि मार्गदर्शनाखाली दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सावळदबारा वनपरिमंडळ अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी अजिंठा निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे घाणेगाव येथे प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रम शाळा येथे वन्यजीव सप्ताह २०२२ या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी घाणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण, वन परिमंडळ अधिकारी अविनाश राठोड ,वनरक्षक एस बी खर्डे, वनरक्षक एस डी चाथे, वनरक्षक जि पी नन्नावरे, वनरक्षक बी आर राठोड, वनरक्षक डी ए वाघ, वनमजूर अंबादास सुर्यवंशी ,के डी महाकाळ , ग्रा.प.सदस्य लक्ष्मणन पवार गावातील प्रतिष्ठित नागरिक, मुख्याध्यापक, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी मानव वन्यजीव संघर्ष , चित्ता re-introduction, आझादी का अमृत महोत्सव , झाडे लावा झाडे जगवा, वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन, जंगल संरक्षण व संवर्धन याबाबत या कार्यक्रमादरम्यान मोलाची माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन सावळदबारा वन परिमंडळ कर्मचारी यांनी केले अशी माहिती सावळदबारा वन परिमंडळ अधीकारी अविनाश राठोड यांनी दिली
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद