देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ राजा माने यांनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले.
महाराष्ट्रराज्या सह देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार, संपादक व विविध पत्रकार संघटना यांचा या महासंघामध्ये समावेश असणार असून पत्रकार, संपादकांच्या विविध समस्या व न्याय हक्कासाठी ही संघटना देशभर काम करणार आहे.
याप्रसंगी बोलताना राजा माने म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना व विविध दैनिक, साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्र करून राष्ट्रीय पत्रकार महासंघ देशभरात उत्तम प्रकारे संघटन करणार आहे. तचेच साप्ताहिक दैनिक यांच्या समोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ काम करणार आहे.
पत्रकार संपादक यांच्यासहअनेक संघटनांचा सहभाग असणार आहे.
राजा माने यांनी घोषित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार महासंघात देशभरातील पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना या महासंघात सहभागी होता येणार असल्याने सर्व पत्रकारांची एकजूट देशभरात दिसणार आहे.