section and everything up until
* * @package Newsup */?> चंद्रमणी फाउंडेशन येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी श्रामणेर शिबीर | Ntv News Marathi


शुक्रवार दिनांक १४/१०/२०२२ ला चंद्रमणी फाउंडेशन बिना जोड, भानेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बौद्ध धम्म अनुलक्षित सीमा भवनाच्या उद्घाटनाचा व श्रामणेर भिक्षु, अनगरिका दिक्षा कार्यक्रम पूजनीय भन्ते अग्गधम्माध्वज ज्ञानेश्वर गुरुजी (कुशिनारा) यांच्या अध्यक्षतेत व म्यानमार येथील राजदूत माँऊ-क्याँ-आँग यांच्या प्रमुख उपस्थितीत, भंतेजी बुद्धशील (म्यानमार), भंतेजी खेम्मानंदा (त्रिपुरा), भंतेजी सत्यशनंदा (त्रिपुरा), यांच्या मार्गदर्शनात सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आयोजित केला असून आयोजन समिती व स्थानिक भारतीय बौद्ध महासभेचे माननीय भाऊसाहेब बोरकर (संघटक), राहुल बागडे, (जिल्हा अध्यक्ष), रामाराव मेश्राम (माजी- अध्यक्ष-खापरखेडा), तुळशिराम बागडे, मनोहर डोंगरे (अध्यक्ष-खापरखेडा), डॉ. जितेंद्र सावजी तागडे (अध्यक्ष-नवीन बिना, भानेगांव), रेवाजी वासनिक(अध्यक्ष-चिचोली), जितेश देशभ्रतार, (सचिव-भानेगांव), डॉ. अशोक गजभिये, कल्पना गजभिये, संजीवनी मेश्राम, मुकेश बागडे (सचिव-नवीन बिना), हिरोज राउत यांनी नागरिकांना बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *