हजारो नागरिकांनी घेतला भोजनदानाचा लाभ
भारतीय बौद्ध महासभा शाखा खापरखेडा वार्ड नं.३ च्या वतीने वर्षवास समाप्ती कार्यक्रम १० ऑक्टोबर रोजी सत्यशील बौद्ध विहार खापरखेडा येथे भंतेजी शांतरक्षित, बुद्धशील, खेम्मानंदा, यत्यशनंदा (त्रीपूरा) यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांना पूष्प अर्पण करून तसेच बाबासाहेब यांचे पूतळयाला माल्यार्पण करूण महापरित्रानपाठाची सूरवात करयात आली. कार्यक्रमाला उपस्थित भंतेजी यांनी त्रिशरण पंचशील, करणीमेत्त सूत्त, महामंगल सूत्त, रतनसूत्त मंगल मैत्री, याची देशना देण्यात आली.
यावेळी भंतेजी शांतरक्षीत यांनी प्रबोधन करतांना खेळ, तमाशा नाच गाण्यामूळे समाजात किळ लागलेली आहे. लोक हे कथा कहानियां मध्ये व्यस्त आहेत,बुध्द विहारामध्ये शील,सदाचार,व धम्म उपदेश करावे , तथागत बूध्दांनी सांगीतले कि जगात द:ख आहे.या दुःखाचे कारण मानवी अहंकार आहे ,या दू:खातून कसे मूक्त होता येईल हा मार्ग सुध्दा त्यांनी सांगितला आहे या मार्गावर चालला तर मनूष्य दू:ख मूक्त होवू शकतो व सदाचारी जीवन जगू शकतो ,असे आपल्या प्रबोधनातून सांगितले. दूपार पासून भोजनदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी लाभ घेतला.याप्रसंगी भाऊसाहेब बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन नरेश पाणतावने यांनी केले तर आभार मनोहर डोगंरे यानी व्यक्त केले. राजू मेश्राम, स्वप्नील खांडेकर संदीप सोमकूवर, अशोक मेश्राम, उमेदलाल राऊत, भीमवराव चक्रे, प्रभाताई तागडे, मीनाषी माने, शोभा मेश्राम, राणी फूलझले,गंगाबाई लोखंडे, किरण शेंडे, गाडेकर यांच्यासह गावातील सर्व उपासक, उपासीकांनी यांची प्रमुख उपस्थिति होती त्यांचे सत्शील बूध्द विहार कमेटीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा