खापरखेडा – स्थानिक नवीन बिना बौद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, राहुल नवयुवक संघ आणि आम्रपाली व संघमित्रा महिला मंडळ शाखा नवीन बिना, भानेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास समाप्ती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात भंते नागधम्म यांच्या हस्ते सामुहिक बुद्ध वंदना घेवून व तथागत बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाई यांच्या मूर्तींना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भाऊसाहेब बोरकर आणि मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण आणि पुष्पांजली देवून करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा नवीन बिन्याचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी वर्षावासाचे महत्व सांगतांना कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट केला. याप्रसंगी भानेगांवचे सरपंच रविंद्र चिखले, विजय वासनीक, विजय गौरकर, विजय निकोसे, उत्तम खोब्रागडे, रवी शेंडे, जितेश देशभ्रतार अनिस चवरे, अमोल कळंबे, चर्मकार एकता व युवा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रमाला हजेरी लाऊन पुष्पांजली अर्पित केली. यावेळी “बुद्ध धम्म प्रचार-प्रसार मैत्री संघ” कोराडी यांनी बुद्ध-भिम गीतांच्या माध्यमाने कार्यक्रमाची रंगत वाढविली तर कार्यक्रमाची सांगता सामुहिक भोजनदानाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष रविंद्र,जी ढोके, सचिव मुकेश बागडे, बंडू डोगरे, अनिल लांजेवार, ओमप्रकाशजी गौरकर, किशोर चव्हाण, राहुल नवयुवक संघाचे सोनू ढोके, मोनू ढोके, आकाश वासनिक, बॉबी गणवीर, संकेत वाहणे, बल्लू चव्हाण, आदित्य धनवटे, नाईद शेख, आम्रपाली महिला मंडळाच्या कांताबाई बागडे, कुसुमताई गौरकर, बेबीबाई वासनिक, राधाबाई गौरकर, नंदाबाई सोमकुंवर संघमित्रा महिला मंडळाच्या सोनाली बागडे, प्रगती बागडे, मालवी नारनवरे, सारिका तागडे, रोहिणी धनवटे, पिंकी गाडेकर, अश्विनी वासनिक, शिल्पा धनवटे, मनीषा चव्हाण, रोशनी गौरकर, आशा गौरकर, त्रिशाला गौरकर, नेहा गौरकर, लता गोस्वामी, वाघमारे ताई यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने बाल-बालिका व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र सावजी तागडे तर आभार सोनू ढोके यांनी मानले. प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा