पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत ७० लाभार्त्यांना पट्टे वाटप
आ.सुनील केदार यांच्या हस्ते लकी ड्रॉ
नागपुर : अकरा वर्षा अगोदर प्रंतप्रधान आवास योजने अंतर्गत सिल्लेवाडा व पोटा ग्रामपंचायत परिसरातील जवळपास १०८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेत मात्र त्यांच्याकडे हक्काची जागा नव्हती वंचित असलेल्या लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच घर मिळावं या संकल्पनेतून पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत दीड एकर शेती मिळवून घेतली त्या शेतजमिनीवर ७० भूखंड तयार करण्यात आले असून पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांच्या प्रयत्नाने वंचित लाभार्थ्यांना त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत साकारण्यात येत असलेली योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रथम ठरली आहे १२ ऑक्टोबर बुधवारला आ सुनील केदार यांच्या हस्ते लकी ड्रॉ च्या माध्यमातून ७० लाभार्त्याना पट्टे वाटप करण्यात आले त्यामूळे स्वार्थी जगात माणुसकी जपणारी माणसे शिल्लक आहेत हे राहुल तिवारी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहेत.
पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत मालकी हक्क पट्टे वाटप कार्यक्रम १२ ऑक्टोबर बुधवार ला सकाळी ११ वाजता दया यशवंत लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर आ सुनील यांच्यासह माजी जि. प.उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे उपसभापती प्रकाश पराते, जि. प.सदस्य प्रकाश खापरे, नलिनी उईके, पं.स.सदस्य राहुल तिवारी, सरपंच पवन धुर्वे, रविंद्र चिखले, प्रमिला बागडे, उपसरपंच विश्वजित सिंह, माजी सरपंच मधुकर दुगाने, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त आदींची उपस्थिती होती.सन २०११ साली प्रंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेसाठी सिल्लेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत ९४ तर पोटा-चनकापूर ग्रामपंचायत अंतर्गत १४ अश्या एकूण १०८ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती लाभार्थी वेकोली परिसरात राहत असल्यामूळे त्यांच्याकडे हक्काची जागा उपलब्ध नव्हती त्यामूळे भविष्यात एकूण १०८ लाभार्त्यांना घुरकुल मिळणार किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मधल्या काळात जि.प.व पं. स.च्या निवडणूका झाल्या यावेळी घरकुल योजने पासून वंचित असलेल्या लाभार्त्याचा प्रश्न समोर आला लाभार्थ्यांनी पंचायत समिती सदस्य राहुल तिवारी यांच्याकडे व्यथा मांडल्या पंडित दिनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते राजा भड यांच्या मालकीची दीड एकर शेती लाभार्थ्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून कब्जा पत्र घेण्यात आले सदर योजना प्रत्येक्षात अमलात आणण्यासाठी राहुल तिवारी यांच्यासह जि.प.सदस्य प्रकाश खापरे, मधुकर दुगाने यांनी आ सुनील केदार यांच्यासह शासन दरबारी पाठपुरावा केला राजा भड यांच्या शेतजमिनीवर एकूण ७० भूखंड पाडण्यात आले लवकरच घरकुल कामाला सुरुवात होणार असून याठिकाणी लाभार्त्याना एक सारखे घर मिळणार हे विशेष!
बुधवारला आ सुनील केदार यांच्या हस्ते सिल्लेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेसाठी पात्र असलेल्या एकूण ९४ पैकी ५४ लाभार्त्यांना तर पोटा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या १४ लाभार्त्यांना पट्टे वाटप करण्यात आले याप्रसंगी शेतकरी राजा भड यांचा सुनील केदार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय आवर्जुन उपस्थित होते.याप्रसंगी आ सुनील केदार यांनी पोटा ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार असल्याचे सांगून भविष्यात पोटा चनकापूर योजना म्हणून ओळखली जाणार असल्याचे सांगितले यावेळी पोटा-चनकापूर ग्रामपंचायत प्रशासनाने लाभार्थी कडून कोणत्याही प्रकारचे फेरफार शुल्क घेणार नसल्याचे जाहिर केले.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर