नागपूर : महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे दिनांक ८ व ९ ऑक्टोंबर रोजी हेडगेवार स्मारक समिती नागपूर येथे पार पडलेल्या ५ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन कार्यकारिणी गठीत झाली आली महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विनोद बन्सोड उपमहामंत्री विलास गुजरमाळे तर उपाध्यक्ष पदावर मोहन देशमुख यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
या अनुषंगाने नुकतेच ११ ऑक्टोबर मंगळवारला श्री राम मंदिर खापरखेडा येथे सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगार तर्फे नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विनोद बन्सोड, उपमहामंत्री विलास गुजरमाळे, उपाध्यक्ष मोहन देशमुख यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून कंत्राटी कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले आगामी काळात कंत्राटी कामगारांच्या हितासाठी अनेक महत्वाच्या योजनाची माहिती कंत्राटी कामगारांना देण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ खापरखेडा सहसचिव सजित येवले, गणेश बहुरूपी, मधुकर सरोदे, राजू सोनेकर, पवन कोठारे, लिलीश चंदनकर, सचिन फोले, माधव बहुरूपी, गणेश बहुरूपी, ज्ञानेश्वर नवले, तिजारे, आशिष खोरगडे, सचिन खोरगडे, मयूर जावळे, ओमप्रकाश मेश्राम, विलास घुगल, किशोर मोहरकर, राहुल बागडे, कमलेश काकडे, आशिष लांजेवार, रुपेश भौवते, विकी बोरकर, दीपक सागर, विजय बागडे, रोशन चक्रे, जयंत बांबोडे, सुरेश बोरकर, पंकज ठवकर, प्रज्ञाशिल रंगारी, उमेश नारनवरे, पवन चरपे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार खापरखेडा शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप येवले यांनी केले.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर