दिवाळी भेट म्हनुन नविन कपडे, चादर, भांडे , अन्न किट वाटप…तर लेकरानां दिवाळीचे फटाके…
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी – मोरगाव तालुक्यातील नांगणडोह हे गाव मोठ-मोठ डोगंराच्या पलिकडे असुन , जिल्ह्याचा शेवटचा गाव आहे. गावात जायला धळ रस्ता नाही पायवाट हा ऐकच मार्ग. संपुर्ण आदिवासी व नक्षलग्रस्त गाव. नांगणडोह गावात ९ (नऊ) आदिवासी कुटुंबाची वस्ती लहान लेकर घेऊन पुर्ण ऐक्कावन (५१) लोक. याच नांगनडोह गावाला वास्तव्यास असलेल्या आदिवासी लोकांच्या घराचीं व शेतींची जंगली हत्तीनीं नासधुस केली होती. भीतीपोटी स्थानीक प्रशासनाने त्या नवही कुटुबांला बोरटोला/धरनोली जिल्हापरिषद शाळेत आसरा दिला. खायला अन्न नाही रहायला घर नाही तर दिवाळी कशी करायची हा प्रश्न त्यानां सतावत होता. यावर गोंदियाचे प्रकल्प अधिकारी व त्यांची टिम यानिं मिशन आधार या ग्रुपच्या माध्यमाने या परिवारानां दिवळी भेट दिली.
शासनाच्या वतिने नऊही आदिवासी कटुबांना मदत मिळायला पाहिजे म्हनुन अनेक सामाजीक संस्था व प्रशासन प्रयत्न शिल आहे. पण तात्काळ याची दखल गोंदिया प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकाश राचेलवार यांनी घेतली. व सकाळी १० (दि.२२) वाजता मिशन आधार अतंर्गत कार्यालईन कर्मचार्यासह बोरटोला/धरनोली जिल्हापरिषद शाळेत वास्तव्यास असलेल्या त्या पिडीत कुटुंबाची दिवाळी भेट घेतली. दिवाळी निमित्त त्या पिडीत नऊही कुटुबांना कपडे, चादरी, भांडे, अन्न कीट लहान लेकरानां दिवाळी फटाक्याचें वाटप केले. त्यावर प्रकल्प अधिकारी यानीं लवकरच या नऊही कुटुंबाच्या पुनरवसनाचा नियोज पाठविन्यात येईल व याचा नियोजन जिल्हाधीकारी पालकमंत्री यांच्या सहकार्यानीं लवकर मार्गी लागनार असुन त्यांच्या हक्काचे घर त्यानां मिळवून देनार असल्याचेही सांगीतले आहे.
नांगणडोह येथिल आदिवासी लोकांची संपुर्ण घरे, शेती जगंली हत्तीनि नेस्त नाबुद केली. त्यावर त्यानां सलग महिन्या भरापासुन बोरटोला/धरनोली जिल्हापरिषद शाळेत वास्तव्यास ठेवन्यात आले आहेत. संपुर्ण क्षेत्र नक्षलग्रस्त आदिवासी बहुल व जंगलव्यात असुन त्या लोकानां रोजगाराचा साधन उपलब्ध नाही. त्या आदिवासी पिडीत नागरीकांनी आम्हाला रहायला जागा व आम्हाला आमच्या हक्काची घरे देन्याची मागनी प्रकल्प अधिकारी यानां केली आहे. प्रकल्प अधिकारी राचेलवार यानीं प्रकल्प कार्यालयाच्या विभागाच्या माध्यमाने लवकरच यांना घरकुल योजनेचा लाभ या नऊही कुटुबानां देनार असल्याचेही सांगीतले. प्रकल्प कार्यालयाने या नऊही कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत प्राथमिक गरजांच्या भेट वस्तु दिल्या मिशन आधार अंतर्गत दिलेल्या भेटीचे आभार त्या नऊही कुटिबांनी मानले.
प्रतिक्रीया
आम्ही नांगणडोह येथे अनेक वर्षापासुन वास्तव्यास आहो. आमचा गाव नऊ कुटुबांचा असुन ऐकुन ५१ सदस्य या गावात आहेत. आम्हाला गावी जान्या येन्यासाठी रस्ता नाही, विद्युत नाही, कोनत्याही सोई सुविधा नव्हत्या. गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा आमचा नांगणडोह गावा त्यावर गडचिरोली जिल्ह्यातुन आलेल्या हत्तीनी आमच संपुर्ण घरे व शेती उधवस्त केली. आता रहायच कुठ व खायचा काय हा प्रश्न आमच्या समोर पडला आहे. त्यातच प्रकल्प कार्यालयाने दिवाळीची भेटी म्हनुन अन्न धान नविन कपडे घरात लागनारे प्राथमीक साहीत लहान मुलानां दिवाळीचे फटाके गोड साहित्य पुरविले आहे.
प्रेमलाल राजिवसाय मडावी नांगणडोह येथिल पुरुष..
प्रतिक्रीया
शासनाने आमच्या राहन्याची व्यवस्ता तर केली. पण आम्हाला आमच्या हक्काची जागा द्यावी. किती दिवस आम्ही या शाळेत राहनार . आमच्या घरांची व शेतीचीं सपुर्ण नुकसान जंगली हत्तीनी केली. आता शासनाने लवकर आम्हचा पुनरवसन करुन द्यावा.
सौ. रामबांई करशु हलामी
नांगणडोह येथिल महिला
परतिक्रीया
मिशन आधार अंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमाने या नऊही कुटुबांना दिवाळी निमीत्त मदत पुरवली आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी या्च्या समोर या नऊही कुंटुंबाच्या पुनरवसनाचा प्रश्न मांडला आहे. यानां शासन नियमानुसार लवकरच पुरनरवसन करुन प्रकल्प कार्यलयातर्फे लवकरच घरकुल योजना पुरवली जाईल सध्या दिवाळी निमीत्त या कुटुबांना जे सहकार्य करता आल ते मिशन आधारा अंतर्गत करन्यात आली आहे.
विकाश राचेलवार प्रकल्प अधिकारी गोंदीया