शिरपुर येथिल अवैध क्रेसरवर ठोठवला होत चार महिन्या अगोदर दंड…
गोंदिया : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायत हद्दीत अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. कपंनी मागील दोन वर्षापासुन वास्तव्यास आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमाकं -6 वरिल पुलाचे काम या कपंनीने घेतलेले आहे. शासन प्रशासनातर्फे विकास कामांना चागंला जोर असला तरी अवैध उत्खननाचा जोर या अग्रवाल ग्लोबल कपंनी कडुन देवरी तालुक्यात चांगलाच केल्या जात असल्याची प्रचीती देवरी तहसील कार्यालचे तहसील दार अनिल पवार यानीं दि. 22 जुन 2022 ला 43,20,000 (त्रेचाळीस लक्ष विस हजार) च्या केलेल्या कारवाईतुन सिद्ध झाली आहे. पण चार महिने लोटुनही आकारलेला दंड वसुल होत नसल्याने तहसील विभाचे वरिष्ट अधिकारीच नागरीकांच्या चर्चेचे विषय ठरले आहेत.
सविस्तर व्रुत्त असे की, दि. 17 जुन 2022 ला अग्रवाल ग्लोबल कंपनीला नोटिसाद्वारे सुचित करण्यात आले होते. त्या साज्याचे तलाठी एस.पी.तितरे, यांच्या प्रतिवेदन मौका चौकशी अहवाल दि.27 मे 2022 तसेच तहसिलदार देवरी व पथक यांनी प्रत्यक्ष केलेली चौकशी पंचनामा अहवालानुसार मौजा सिरपूर /बांध येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.6 ह्या रोडाचा पूल बांधकाम संबंधित कच्चा मटेरियल ठेवण्यासंबंधी खाजगी गट क्र.52 क्षेत्र 1.98 हे. आर. आवंटित करण्यात आलेले होते. त्या गटाची तपासणी महसुल विभागातर्फे केले असता स्थळ निरीक्षण दरम्यान अंदाजे 1000 ते 1200 ब्रास दगड अनाधिकृतपणे उत्खनन करून गिट्टी तयार केल्याचे मौका पंचनामा व तलाठी प्रतिवेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. त्या अर्थी अग्रवाल ग्लोबल कंपनी प्रा. लि. विना परवाना 1200 ब्रास दगड उत्खनन केल्याबाबत आपले काय म्हणणे आहे याबाबतचे नोटिस दि. 29 जुन 2022 रोजी हजर राहन्याचे तहसीलदार यांच्या आदेशाने काढन्यात आले. परंतु चार महिने लोटुनही कोनाताही खुलासा तहसील कार्यालय देवरी तर्फे करन्यात आलेला नाही.
अग्रवाल ग्लोबल कपंनी प्रा.लि या कंपनिने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये । ब्रास दगडचे स्वामित्वधन 600/- रूपये व स्वामित्वधन मुल्याचे 5 पट दंड रक्कम रूपये 600 X 5 = 3000/- असे एकुण रक्कम रूपये 3600/- याप्रमाणे 1200 ब्रास दगडाचे 1200 X 3600 = 43,20,000/- रूपये (अक्षरी-त्रेचाळीस लक्ष वीस हजार रूपये) आकारण्यात आले होते. त्यानुसार 1200 X 3600 =43,20,000/- रूपये एवढी दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याचे नोटीस अग्रवाल गलोबल कपंनीला पाठविन्यात आले होते. यावर दोन महिन्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यासी चर्चा केली असता सध्या सुनावनी सुरु असल्याचे त्यानीं सांगीतले. पंरतुु चार महिने लोटुनही त्या अवैद उत्खनन केलेल्या व 43,20,000 हजार रुपयाचा दंड ठोठवलेल्या व शासनाच्या महसुल बुडविनार्या त्या कपंनी कडुन आकारलेला दंड वसुल करन्यात आला नसल्याने, महसुल निभागाच्या अधिकार्यांचांच यात सहभाग तर नाही ना..?अस्या उलट सुलट चर्चानां चांगलाच उधान देवरी तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. यावर स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधीकारी काय निर्णय घेतात याकडे जन प्रतिनीधी सह नागरीकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रीया
अग्रवाल ग्लोबल कंपनिवर दंडात्मक कारवाई करुन वरिष्ट कार्यालयाला त्याचा अहवाल पाठवला आहे. वरिष्ट कार्यालयच त्या कपंनीवर दंड ठोठायला का ईतका वेळ लावते हे मला माहीत नसुन, मि आपली कारवाई करुन उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यानां अहवाल सादर केला आहे.
अनिल पवार (तहसीलदार देवरी)