सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील शिवाजी बल्लाळ हे सध्या नाशिक येथे कार्यरत असून त्याची नुकतीच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे बल्लाळ यांचे अभिनंदन होत आहे.ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील नागरीक आपली उपजीविका भागविण्यासाठी

नाशिक शहरामध्ये कामांसाठी येत असुन मराठवाड्यातून आलेल्या नागरीकांना कामधंदा, व्यापार, व्यवसाय नोकरी आधीसाठी बऱ्याच प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो ग्रामीण भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन ची निर्मिती करण्यात आली असून या फाउंडेशन ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये हिंगोलीच्या जिल्हाध्यक्षपदी केंद्रा बुद्रुक येथील शिवाजी बल्लाळ यांची निवड करण्यात आली आहे त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.

शिवाजी बल्लाळ यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील नागरीक शहरी भागात कामं करण्यासाठी येत असुन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कार्य करीत राहणार आहे शिवाजी बल्लाळ यांची मराठवाडा सामाजिक फाउंडेशन हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रा बु.येथील तंटामुक्ती अध्यक्ष नाजेर महमद हनिफ शहा यांच्या वतिने बल्लाळ यांचे स्वागत करण्यात आले यावेळी
बटवाडी येथील सरपंच नामदेव झाडे,सुनिल डांगे,किशोर सुलताने, सुमित कुलकर्णी, नारायण डांगे,नाथराव बल्लाळ,बालाची तसे आदींची उपस्थिती होते.