लातूर :
हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल लातूर येथे सय्यद नगमा इनायत यांनी सायबर सिक्युरिटी या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबुक, त्या माध्यमातून अकाउंट हांकिंग तसेच इत्यादी प्रकारचे गुन्हे कशाप्रकारे घडतात व यापासून कसं बचाव करता येईल या विषयीशी संबंधित सर्व परिपूर्ण अशी माहिती इयत्ता नववी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना आज प्राप्त करून दिली. याबद्दल सय्यद नगमा व त्यांच्या सहकाऱ्यांचे शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आलेय अशी माहिती संस्थेचे सचिव आडवोकेट फारुख शेख यांनी दिली. या संस्थेत विविध क्षेत्रातील माहिती संस्था व मुख्याध्यापक मार्फत वेगवेगळ्या तज्ञाच्या माध्यमातून देण्याचे कार्य करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचा विकास व विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील ज्ञान प्राप्त हाच या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असल्याचे यावेळी संस्थेतर्फे सांगण्यात आलेय. कार्यक्रमात संस्थेचे सचिव आडवोकेट फारूक शेख, मुख्याध्यापक सय्यद इनायत सर, शिक्षक मुस्तफा सर, शिक्षिका फरहाना शेख मॅडम आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9850347529