उमरगा : प्रतिनिधी सचिन बिद्री
उस्मानाबाद : उमरगा पोलिस ठान्याचे चे पथक दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी शहरात गस्तीस असताना शहरातील मध्यवर्ती ठिकानातील बसस्थानकासमोरील जुन्या शाळेच्या आवारात असलेल्या तीन जणांच्या टोळक्यास पोलीसांनी हटकले. यावेळी नरेश याटे, महेंद्र गौड, इम्रान गुलफरोश हे तीघे छोट्या पुडीत अवैधरित्या “गांजा’ हा अंमली पदार्थ बाळगुन चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याचे आढळले. यावरुन पोलीस नाईक- अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एनडीपीएस कायदा कलम- 8, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.