section and everything up until
* * @package Newsup */?> उस्मानाबाद : भूम तालुक्यातील चार अवैध खाडी केंद्र सील,जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कारवाई | Ntv News Marathi

सचिन बिद्री,प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ,अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भूम तालुक्यामधील चार अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करत सील करण्यात आले आहे.

याबाबत पंचनामा करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर कार्यवाहीत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे , नायब तहसीलदार सावंत , श्री राठोड, श्री पाटील तसेच मंडळ अधिकारी श्री स्वामी, श्री पाटील, श्री हाके, तलाठी श्री थोरात, श्री केदार, श्री पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कार्यवाही करण्यात आलेल्या खडी केंद्राच्या ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी,कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आला आहे .
तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets मोजणी करून त्याबाबत कारवाई केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *