उस्मानाबाद प्रतिनिधी:सचिन बिद्री
उस्मानाबाद : समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात, आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे हीच बाब ओळखुन शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार चे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षीचे पाचवे वर्ष आहे.
1) सौ. प्रज्ञा विकासराव कुलकर्णी कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा 2) श्री. संजय ज्ञानोबा देशमुख भारत विद्यालय उमरगा 3) श्री. गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी 4) श्री. चंद्रकांत लक्ष्मण तांबे श्री गुरुदेव दत्त हायस्कुल भुम 5) श्रीमती. सुषमा श्रीकांत मसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगाव 6) श्री. रवींद्र शिवाजीराव माने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजखेडा 7) श्री. सुनील गोंविदराव काळे हरिभऊ घोगरे उच्च प्राथमिक व माध्यमिक उपळे (मा) 8) श्री. सचिन बाळासाहेब छबिले छञपती शिवाजी विद्यालय वाशी 9) श्री. दत्ताञय प्रभाकर काशीद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचपुर 10) सौ.सुलभा गजानन देशमाने आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय धाराशिव 11) श्री. हरिश्चंद्र भगवान शिंदे छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद 12) श्री. नितीन दशरथ ढगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द) 13) श्रीमती.कांचन गौतम काशीद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी. या शिक्षकांना यावर्षीचा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असुन यावर्षी चा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद चे सुधीर आण्णा पाटील यांना देण्यात येणार आहे. गतवर्षी चे व यावर्षी चे पुरस्कार वितरण या महिन्यामध्ये विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्था सचिव आभिलाष लोमटे यांनी दिली आहे. सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, संस्कृती प्रतिष्ठान अध्यक्ष राम मुंडे, सचिव प्रविण गोरे कोषाध्यक्ष प्रशांत जाधवर, एकता चे कार्याध्यक्ष विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदीनी आभिनंदन केले.