उस्मानाबाद : उमरगा शहरातील अंगणवाडीत क्र.3,4,आणि 6 एकत्रितपणे पाककृती स्पर्धा आयोजित करून बालविकास प्रकल्प अधिकारी बि एच निपाणीकर व पर्यवेक्षिका स्नेहा वाघे यांच्या नेतृत्वाखाली उमरग्यात राष्ट्रीय पोषण आहार महिना संपन्न झाला.

तिन्ही अंगणवाडी एकत्रित येऊन केलेल्या पाककृती स्पर्धेत पौष्टिक आहाराची मांडणी करण्यात आली होती तर अंगणवाडी सेविका सावंत बेबी नंदा यानी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सेविका मुळे ज्योती यांनी पौष्टिक आहार-पोषण वाटिका,योगासन करणे,माझी कन्या भाग्यश्री,सुकन्या योजना,मातृ वंदन योजना, कोविड लसीकरण घेणे.तसेच मुलाची योग्य रीतीने काळजी घेतली पाहिजे मुल कुपोषित होणार नाही या विषयावर माहिती दिली. मदतनिस वर्षा सोनकांबळे यांनी या कार्यक्रमात आभार व्यक्त केले तर या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सावंत, बेबी नंदा, मुळे ज्योती, शेख फरजाना व लोहार महादेवी, सोनकांबळे वर्षा,सोनकांबळे संगीता,आणि गरोदर माता, किशोरी स्तनदामाता व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.