
अंबी येथील. बाप्पू विश्वनाथ भोसले या नव- वराचा नांदेड येथील एका तरुणी सोबत दि.18/9/2021रोजी थोडक्याच लोकांत स्वघरी विवाह पार पडला होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी प्राथ-विधींचे कारण सांगून नववधू लग्नात अंगावर घातलेल्या दागिन्यांसह तिच्या इतर साथीदारासह पळून गेली. यावरून आंबी पो-ठाणे येथे गु.र.क्र.146/2021 हा भा. द.सं. कलम 406,420, 34- अंतर्गत नोंदवीन्यात आला आहे . आंबी पो-ठाणे चे सपोनि श्री आशीष खांडेकर, पोहेकॉ पाटील, पोना-लक्षमन माने,शिदेश्वर शिंदे पोकॉ . सतिश राऊत, प्रभु कातुरे,राम किसन कुंभार,साबिया शेख,या पोलिस पथकाने तातडीने तपास करून बोगस वधू सह तिचे तिन साथिदार – आप्पा भांगे ,शुभम दवने, नारायण सोनटक्के या चौघांना लग्नातिल दागिन्यांसह अटक करण्यात आले आहे.
प्रतिनिधी – विशाल शिंदे आंबी भुम उस्मानाबाद.