हिंगोली : जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून 53 पैकी 53 परीक्षा केंद्रावर 13 /3 /2013 रोजी सकाळ सत्र गणित भाग एक या विषयाचा पेपर पार पडला असून इयत्ता दहावीच्या गणित भाग 1 विषयाचा परीक्षेला 15544 विद्यार्थ्यापैकी 15186 विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितीचे प्रमाण 97.69% राहिली तर दुपारच्या सत्रात बारावीच्या 33 पैकी 21 परीक्षा केंद्रावर अर्थशास्त्र या विषयाच्या पेपला 2348 पैकी 2220 विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितीचे प्रमाण 94.54% राहिली विभागीय मंडळांनी नेमलेले 6 भरारी पथकांनी आज हिंगोली जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या यामध्ये गुलामनबी आझाद उर्दू हायस्कूल कळमदूरी जी ,हिंगोली या दहावीच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थीनी कॉपी प्रकार केला असून त्यावर कारवाई करण्यात आली प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असून प्रत्येक परीक्षे केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने आन करण्याकरिता सहाय्यक परीक्षा का सोबत पोलीस कर्मचारी देण्यात आलेले आहे तरआज पेपर सुरळीत पार पडला
प्रतिनिधी
महादेव हरण
हिंगोली