पालघर : ( मोखाडा ) — तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील शिक्षकांनी कोवीड सहाय्यता निधी म्हणून दोन लाख रुपये जमा केले आहेत. राज्यात कोविड ची तिसरी लाट येणार असल्याने आरोग्य विभागाकडून ही लाट रोखण्यासाठी सर्वतो परी प्रयत्न केले जात आहेत.अशातच शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या प्रेरणेतुन कोविड ग्रस्तांना मदत व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक नितिन आहेर यांनी व्हाटस्पचा सद उपयोग करत शिक्षकांचा व्हाटस्प ग्रुप तयार करुन भविष्यात उद्भवणाऱ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी वीस बेड,एक टीव्ही व दोन साऊंड सिस्टम कोवीड केअर सेंटरसाठी शिक्षकांच्या वतीने देण्यात आले आहेत.

कुठलेही देशसेवेचे किंवा सामाजिक काम असो शिक्षक सामाजिक बांधिलकी जोपासत आपले योगदान देत असतो स्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, जनगणना असो किंवा शाळा स्तरावरील गावकीचा विकास असो या प्रत्येक प्रक्रियेत शिक्षकांचे योगदान अद्वितीय असते.मग कोवीड सारख्या जागतिक समस्येत शिक्षक अलिप्त कसा राहू शकतो ? तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोवीड मदतनिधी म्हणून आपण शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये कोवीड सहायता निधी जमा करूयात,असे भावनिक आवाहन शिक्षक नितीन आहेर यांनी शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर केले.या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षक राजेंद्र जाधव व नितीन आहेर यांच्याकडे फोन पे व प्रत्यक्ष माध्यमातुन निधी जमा करण्यात आला. या आवाहनाला प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप, गटविकास अधिकारी पांढरे, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,कार्यालयीन कर्मचारी यांनीही कोवीड सहायता निधी जमा करण्यास हातभार लावला.शिक्षकांच्या या सामाजिक उपक्रमाचे राजकीय,सामाजिक सर्वच स्तरांतुन कौतुक होत आहे.

“ शिक्षक नितिन आहेर यांनी व्हॉट्स एप ग्रुपच्या माध्यमातून दोन लाख निधी जमा करून कोवीड केअर सेंटरला वस्तुरूपी जी मदत केली आहे हि कौतुकास्पद घटना आहे.मी मोखाडा तालुक्यातील शिक्षकांचे अभिनंदन करतो.
-ज्ञानेश्वर ( शिवा ) सांबरे. उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *