पालघर : जिल्ह्यात 2 लाख लसीचा साठा उपलब्ध झाला असून गणेशोत्सवा आधी जास्तीत जास्त जनतेने लसीकरणा चा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी केले आहे. दि. ७/९/२०२१ रोजी आरोग्य समिती ची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.लसीकरणाच्या वेळी सर्व कोव्हीड नियमांचे पालन करावे तसेच गरोदर मातांसाठी प्रत्येक लसीकरण वेगळी व्यवस्था असून गरोदर मातांनीही लसीरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापतींनी केले.

जिल्ह्यात एकाच दिवशी ८० हजार लसीकरण केल्याचा विक्रम केल्याबद्दल सर्व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा अभिनंदनाचा ठराव यावेळी सभापती आणि सर्व आरोग्य समिती सदस्यांच्या वतीने घेण्यात आला. या बैठकित सर्व तालुक्यांचा कोव्हीड ची सद्यस्थिती, लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.ज्या गावांमध्ये कोव्हीड चे जास्त रुग्ण सापडले आहेत आणि आणि जास्त रुग्ण मयत झाले आहेत अशा गावात लसीकरणाला प्राधान्य द्या. आता उपलब्ध झालेली लस लवकरात लवकर संपवण्यासाठी नियोजन करा, लसीकरणा साठी जास्तीत जास्त जनतेला प्रवृत्त करून लसीचे महत्व पटवून द्या अशा अनेक सूचना या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.