सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील पत्रकार मुजीब शेख यांची पुतणी माहेक शेख मोसिन ( वय-७ ) यांची मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास ) पूर्ण केला आहे. पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवने खूप महत्वचे मानले जाते . त्यामुळे मुस्लिम समाजातील बहुतांश नागरिक रोजा ठेवतात. माहेक शेख या लहानशा चिमुरडीने एवढ्या कळकळत्या उन्हाळ्यात रोजा (उपवास) ठेवून पूर्ण देखील केला आहे . या उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्यांना देखील तहान भूक लागते परंतु इतक्या छोट्या मुलीने अल्ला ईश्वरा प्रती आपली असलेली भक्ती प्रार्थना यातून तिने हे शक्य केले आहे. याबद्दल तिचे काका मुजीब शेख परिवारातील सर्व सदस्य तिचे आजोबा शेख काय्युम व मित्रमंडळ यांनी तिचे कौतिक केले आहे .
सिल्लोड प्रतिनिधि मुजीब शेख