तीन महिन्यापासून पगारी नाही,कुटुंबावर पासमारीची वेळ
(सचिन बिद्री:उमरगा)
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दि 12 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तलमोड येथील एस टी पि एल कंपनीच्या टोल नाक्यावर कार्यरत एकूण बारा सेक्युरिटी गार्ड, एक सुपर वायजर आणि एक गणमॅन असे चौदा कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून पगार दिले नसल्याने अक्षरशः कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग ओढवले आहे. या टोल नाक्यावर उमरगा तालुक्यातील तुरोरी, धाकटीवाडी, थोरलीवाडी, कराळी, जाजनमुगळी आणि जम्मू काश्मीर राज्यातील एक कर्मचारी असे एकूण चौदा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमार होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मार्च 2023 पासून अद्याप पगार न झाल्याने कुटुंबावर तीन महिने दुष्काळ पडले असून जगणे कठीण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत बी सी एल कंपनीचे अधिकारी मयूर चितोडकर यांना वारंवार विचारना करूनही कंपनीतर्फे केवळ आश्वासन दिले जाते त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली आहे की बंद पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या चुली चालू करून न्याय देण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर तानाजी मंडले,चंद्रकांत दाजी जोगे,कुमार मोरे, सुनील मेकाले, परशुराम चव्हाण, रोहित जोगदंड, धनराज सूर्यवंशी, दिपक जाधव, चैतन्य भोसले, राम मोरे, मारुती बोकले,अविनाश पाटील, दौलप्पा मिसाळे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.