शहरात निकृष्ट काम करून निधी हडपण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी नळदुर्ग

तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरांमध्ये नगरपालिकेसाठी विकास निधीसाठी 111 कोटी रुपये निधी आला. असून या निधी वरती शहरातील भाजप नेते डल्ला मारत आहेत.
काही ठिकाणी शहराच्या विकासासाठी रस्ते गटार हे काम सुरू आहे .हे काम काही भाजपच्या नेत्यांनी घेऊन अनेक ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे करून कोट्यावधी रुपये वर निधी हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत शहरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम गटारीचे काम सुरू आहे हे काम अंदाजपत्रुसार होत नाही.

कामावरती अभियंता उपस्थित राहत नाही हे काम तात्काळ थांबावे अशी मागणी शहर नागरिकांतून होत आहे झालेल्या कामाची चौकशी करून कॉलिटी कंट्रोल बोर्ड कडून या कामाची चौकशी करून बिले देण्यात यावे अन्यथा बिले देण्यात येऊ नये अशी मागणी शहर वर्षांतून होत आहे सुरू होत असलेल्या या भ्रष्टाचाराला तुळजापूरचे आमदार राणाजितगिसिंह पाटील यांनी लक्ष देतील का याकडे आता सर्वांचं लक्ष लागला आहे.