* * @package Newsup */?>
श्री. महेश पांडुरंग कदम (मुंबई दूरदर्शन कॅमेरामन- मुक्त पत्रकार) व श्री. विनोद पांडुरंग कदम- श्री. मनोज पांडुरंग कदम ( मुंबई रुग्णालय सेवेकरी तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी) ह्यांचे वडील कै. पांडुरंग सखाराम कदम (मुंबई रुग्णालय सेवानिवृत्त कर्मचारी, शिवसेना माजी गटप्रमुख ) यांचे गुरुवार दिनांक: २९/०२/२०२४ रोजी दुपारी अल्पाशाचे आजाराने आकस्मिक निधन झाले. | Ntv News Marathi
आमचे वडील आदरणीय पांडुरंग कदम यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी अत्यंत दुर्दैवी, अनाकलनीय आहे, या आकस्मिक घटनेने नियतीवरचा विश्वास कमी झालायं, नियती कुणाला सावरायची संधीच देत नाही. आमच्या वडिलांच्या निधनाने मन हेलावून गेले. बाबांच्या जाण्याने कुटूंबियांचे छत्र गमावल्याची ही भावना क्लेशदायी आहे. परिवारावर कोसळलेल्या ह्या दुःखातून कुटुंबियांना सावरण्याचे बळ देव देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. वडिलांचा ७२ वर्षांचा सहवास हा अनमोल होता. ते वारकरी सांप्रदायातील सेवेकरी होते. दरवर्षी पंढरपूर व आळंदी चे वारी करायचे, खुप कष्टालु , मेहनती, आधारस्तंभ व प्रेरणादायक होते. त्यांचा मागे ३ मुले, १ मुलगी, सुनं व नातवंडे असा मोठा परिवार आहे. शोकाकुल: समस्त कदम परिवार. बाबांना…. आदरयुक्त भाव सुमनांजली.. ॐ शांती