बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून मलकापूर नगर परिषद हद्दीत एका कंपनीकडून प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता परिसरातील नवीन रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे नगर परिषद प्रशासनाकडून या कंपनीविरूध्द कुठलीही कारवाई करतांना दिसत नसल्याने यामध्ये काहीतरी काळेबेरे झाल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी केला असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  मलकापूर नगर परिषद हद्दीतील बुलडाणा रोडसह इतर भागामध्ये एका नामांकीत कंपनीकडून कुठलीही परवानगी न घेता रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. स्वफायद्यासाठी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम करणाऱ्या ‘त्या’ कंपनी विरोधात नगर परिषद प्रशासनाकडून तात्काळ योग्य ती अशी कारवाई करण्यात यावी व त्यांचे विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार देवून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा येत्या दोन दिवसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालनातच आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी अजय टप यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *